⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

Ahirani Songs : खान्देशी अहिराणी गाण्यांची जगभर धमाल, तुमच्या ‘प्ले लिस्ट’ला असायलाच हवी ही अहिराणी गाणे

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । सोशल मीडियाच्या जगात गेल्या काही वर्षात मोठी क्रांती झाली आहे. विशेषतः कोरोना, लॉकडाऊन काळात अनेकांना आपले कलागुण आणखी जोपासण्यासाठी संधी मिळाली. सोशल मिडियातून आपली कला जोपासून पैसे देखील कमावता येतात हे लक्षात आल्यावर गाणे निर्मिती, काहीतरी वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षात अहिराणी गाण्यांनी (Ahirani Songs) सोशल मीडियावर तुफान धूम केली आहे. अगदी विदेशात देखील अहिराणी गाणे वाजत आहेत. खान्देशातील लग्न (Khandeshi Ahirani Marriage Sons) समारंभ आणि आनंदाच्या क्षणी अहिराणी गाणे वाजले नाही तर कार्यक्रमच पूर्ण होऊ शकत नाही असे आहे. कर म्हन लगीन, हाई मोबाईलवाली साली, देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी, पैसावाली ताई, फिरफिरी नाच, बबल्या ईकस केसावर फुगे अशा काही भन्नाट गाण्यांची प्ले लिस्ट तुमच्याकडे असायलाच हवी.

खान्देशी (Khandeshi Ahirani Songs) गाण्यांची जोरदार हवा असून अवघ्या काही तासात गाण्यांना हजारो लाखो नव्हे तर करोडो व्ह्यूज मिळतात. सचिन कुमावत, बी.आर.म्युझिक, अंजना बारलेकर, सिंगर भैय्या मोरे, विनोद कुमावत यांच्या गाण्यांनी अख्खे युट्युब गाजविले असून काही गाण्यांनी तर चक्क ९० मिलियन म्हणजे तब्बल ९ कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. जळगाव लाईव्हच्या माहितीनुसार सोशल मीडियाच्या युट्युब प्लॅटफॉर्मवर आजवर सर्वात मोठा इतिहास रचलेले खान्देशी गाणे म्हणजे बबल्या ईकस केसावर फुगे हे गाणे. अवघ्या तीन वर्षात या गाण्याला तब्बल २५४ मिलियन म्हणजेच २५ कोटी ४० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. खान्देशातील कलाकारांनी मारलेली ही मजल कौतुकास्पद असून अजूनही काही गाणी दर महिन्याला सोशल मीडियात येत असतात. काही कलाकारांनी तर जेमतेम उभारलेल्या आणि मोबाईलवर चित्रित केलेल्या गाण्याच्या आधारे आपले वेगळेपण जपले आहे.

अहिराणी गाणे – पैसावाली ताई..

युट्युब प्लॅटफॉर्मवर १२ डिसेंबर २०१९ रोजी पैसावाली ताई हे गाणे रिलीज करण्यात आले होते. बी.आर.म्युझीकने रिलीज केलेल्या या गाण्याची निर्मिती बाबु मोरे (सावदा ता.भडगाव) यांनी केली आहे. गायक प्रमोद मोरे (सावदा), संगीत मच्छिन्द्र सोनवणे (वलवाडी), रेकॉर्डिंग प्रमोद महाजन (जळगाव), कलाकार विद्या भाटिया आहेत. पंकज रावते यांचे सहकार्य लाभले असून एडिटिंग राहुल गुजर यांनी तर डीओपी ऋषिकेश चौधरी, आर सी फोटोग्राफीचे सौजन्य लाभले आहे. आजवर या गाण्याला ४ कोटी ८३ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Khandeshi Ahirani Song- माडी वहू तुले येईजाई करमन लगन..

विनोद कुमावत यांनी मनोरंजनासाठी तयार केलेल्या माडी वहू तुले येईजाई करमन लगन.. या गाण्याने तर अख्खे सोशल मीडिया हलवून टाकले होते. टिकटॉक, इन्स्टाग्रामला तर या गाण्यावर अनेक रिल्स तयार करण्यात आल्या. विनोद कुमावत प्रस्तुत गाण्याचे डायरेक्शन समाधान बेलदार, योगेश बेलदार यांचे आहे. गाण्याचे सहकलाकार विनोद कुमावत, समाधान बेलदार, माधुरी बेलदार, बेबाबाई बेलदार, गणेश कुमावत, अक्षय बेलदार, सचिन कुमावत, रोषन गुप्ता, सोपान हटकर, राकेश बोरसे, रामकृष्ण सूर्यवंशी, भैय्यासाहेब मोरे आहेत. गायक व लेखक भैय्यासाहेब मोरे असून रेकॉर्डिंग समीर शेख, नाशिक, संगीत भावेश पचरस, रिधम आसावरी रेकॉर्डिंग स्टुडिओ मालेगाव, व्हिडिओ एडिटर मुकुंद बसते हे आहेत. ३ जानेवारी २०२१ रोजी युट्युबला रिलीज झालेल्या या गाण्याला आजवर तब्बल ४ कोटी ६९ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. याच गाण्यावर आधारित ‘माडी जावई तुले व्हई जाई कर मन्ह लगण’ या फिमेल व्हर्जन गाण्याला ४ कोटी ९९ लाख व्ह्यूज मिळाले आहे. अतिश बैरागी प्रोडक्शन व कादंबरी म्युझीक इंटरटेन्मेन्ट निर्मित हे गाणे सिंगर भैय्या मोरे या चॅनलवर प्रकाशित करण्यात आले आहे.

अहिराणी गाणे- फिरी फिरी नाच पोरी..

युट्युब प्लॅटफॉर्मवर ५ मार्च २०२० रोजी बी.आर.म्युझिक यांनी हे गाणे रिलीज केले आहे. गाण्याला आजवर ३ कोटी ४१ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्याचे निर्माते बाबु मोरे सावदे ता.भडगाव हे असून कलाकार पूजा वाघ (नाशिक) आहे. गायक प्रमोद मोरे, रेकॉर्डिंग प्रमोद महाजन, संगीत मच्छिन्द्र सोनवणे (वलवाळी), सिनेमॅटोग्राफर प्रवीण महाजन (बाप्पा द स्टुडिओ, कोळगाव, ता. भडगाव), सह कॅमेरामन जयेश खैरेनार, रवी महाजन, ज्ञानेश्वर पवार, ड्रोन साहाय्य किशोर महाजन, एडिटिंग अल्पेश कुमावत (पाचोरा), नृत्य एकलव्य ग्रुप तरवाडे यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच कायदा भिमाचा ग्रुप सावदेचे सहकार्य लाभले आहे.

New Khandeshi Song- तूना प्यार मा पागल वयना ये..

बेवफा सॉंग म्हणजेज सॅड सॉंग प्रकारातील तूना प्यार मा पागल वयना ये.. या गाण्याची देखील सोशल मीडियात मोठी धूम आहे. खान्देशी गाणे अनेक ठिकाणी ऐकले जाते. काहींनी गाण्याचे रिमिक्स व्हर्जन देखील आणले आहेत. जगदीश संधानाशिव युट्युब चॅनलवर २२ ऑक्टोबर २०२० रोजी रिलीज करण्यात आलेल्या या गाण्याला आजवर ४ कोटी १२ लाखांच्यापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्याचे निर्माते ठाणे येथील पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण हे असून कलाकार अक्षय कोळी, साधना मोरे, पंकज सोनवणे, दादू बेलदार असे आहेत. गीतकार, गायक, संगीत जगदिश संधानशिव, रेकॉर्डिंग रिधम साई गोल्डन स्टुडिओ (शिरपूर), श्याम बाशिंगे, व्हिडिओ शूट महेंद्र मोरे, माही फोटोग्राफी, एडिटिंग अक्षय फोटोग्राफी अक्षय कोळी, पोस्टर डिझाईन अमोल पवार, संगीत संयोजक दिनेश बाशिंगे (शिरपूर) हे आहेत. गाण्यासाठी ईश्वर माळी, राम बाशिंगे, शाम बाशिंगे, कमलेश ईशी, पंकज सोनवणे, मनोज कोळी, प्रसाद बागल, विशाल शिसोदे, भूषण जाधव, अपूर्व सुशिर, अविनाश थाटशिंगार, अमोल सातदिवे, महेंद्र जापीकर, वेदांत बेलदार, विजय संधानशिव, पाईप फॅक्टरी, व डांगरीया (वर्षी). निशांत बोरसे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.

Ahirani New Song– सावन ना महिना मा..

अहिराणी संगीत क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या गाण्यांपैकी महत्वाच्या असलेल्या काही गाण्यांच्या यादीत वर येणारे गाणे म्हणजे सचिन कुमावत यांचे सावन ना महिना मा.. सचिन कुमावत यांनी आजवर सर्वाधिक अहिराणी गाणे या सृष्टीला दिली असून जवळपास सर्वच सुपरहिट देखील आहेत. सावन ना महिना मा.. हे गाणे युट्युबवर ९ एप्रिल २०१८ रोजी रिलीज करण्यात आले असून आजवर तब्बल ९ कोटी ४४ लाख लोकांनी ते पाहिले आहे. एस.के.म्युझीक स्टुडिओच्या रेकॉर्डिंग स्टुडिओच्या माध्यमातून साकारलेल्या हा गाण्याचे गीतकार सचिन कुमावत (शेंदुर्णी), कलाकार सचिन कुमावत, पुष्पा ठाकुर, दिग्दर्शक अँड.नरेंद्र डाकोरकर, अमोल पाटील अल्टिमेट आर्ट स्टुडिओ, संगीत संयोजक किशोर शिरसाठ, चंदु मैलागीर, छायाचित्रण अमोल आणि राहुल पाटील (अल्टिमेट आर्ट स्टूडिओ, पाचोरा) गायक सूरज पाचून्दे, न्रूत्य दिग्दर्शक समाधान निकम, निर्मिती व्यवस्था राहुल गुजर हे आहेत.

Ahirani Superhit Songबबल्या ईकस केसावर फुगे..

अहिराणी गाण्याच्या इतिहासात क्रांती आणणारे गाणे म्हणजे ‘बबल्या ईकस केसावर फुगे’ हे गाणे आहे. २८ मार्च २०१९ रोजी युट्युब प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आलेलय या गाण्याने अनेकांना अक्षरशः वेड लावले होते. सोशल मीडियात, लग्न सोहळ्यात कुठेही पहिले तर तेच गाणे कानी पडत होते. आजही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही. तीन वर्षात या गाण्याने दोन चार नव्हे तर तब्बल २५ कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. सचिन कुमावत यांनी सादर केलेल्या या गाण्यात कलाकार म्हणून सचिन कुमावत, अण्णा सुरवाडे, कृष्णा जोशी, बाळू वाघ, संजय सोनवणे हे आहे. गायक अण्णा सुरवाडे, संगीत सचिन कुमावत, नृत्य दिग्दर्शक समाधान निकम, कॅमेरा ऋषिकेश चौधरी, रिदम डी.जे.अभिनव, प्रोडक्शन राहुल गुजर यांचे आहे. चॅनल टीम कृष्णा जोशी, संजय सोनवणे, बाळू वाघ, अल्पेश कुमावत, ऋषी चौधरी, राहुल चौधरी, सोनू चौधरी, कुणाल थेटे, विजय बनकर, साहेबराव इंगळे यांचे सहकार्य लाभले आहे.