⁠ 
शनिवार, मे 4, 2024

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील १२६ शाळांमध्ये मिळणार मोफत पाठ्यपुस्तके !

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२३ ।  भडगाव तालुक्यातील ८ केंद्रात असलेल्या १२६ शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठय पुस्तके देण्यात येणार आहेत. भडगाव गटशिक्षणाधिकारी यांच्या आदेशाने तालुक्यात सर्वच शाळांवर पाठ्यपुस्तके पोहचविण्यासाठी नियोजन सुरू आहे.

दर शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीस शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके शासन स्तरावरून उपलब्ध करून दिले जातात. यावर्षीही प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. शिक्षण विस्तार गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीत मराठी, सेमी व उर्दु माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांचे तालुका स्तरावरूनकेंद्रस्तर ते शाळास्तरापर्यंत एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रत्येक इयत्तेचे चार भाग वितरण करण्यात यावे यासाठी नियोजन सुरू आहे.

तालुका स्तरावर प्राप्त पाठ्यपुस्तकात मराठी माध्यम व सेमी विषय निहाय पहिली २०६६ , दुसरी २०२३, तिसरी २३४४, चौथी २०४३, पाचवी २२९४, सहावी २२८०, सातवी २२०४ तर आठवीसाठी २३४४ विद्यार्थ्यासाठीचे एकात्मिक पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. सेमी इंग्रजी माध्यमाच्या पहिलीसाठी ८९१, दुसरी ८३९, तिसरी ३६९, चौथी ४९०, पाचवी ८७०, सहावी ९३१, सातवी ९५९ व आठवीसाठी ९६६ विद्यार्थ्यांची पाठय पुस्तके प्राप्त झाली आहेत. तर उर्दु माध्यमातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके प्राप्त होणार आहेत.


सर्व शाळांना पाठ्यपुस्तके वितरणासाठी डाटा एन्टी किशोर पुजारी, समावेशीत शिक्षण तज्ञ निंबा परदेशी, सुभाष माळी, मनोहर माळी, विशेष शिक्षक मिलिंद सोनवणे आदी परिश्रम घेत आहेत.