‘त्या’ वृध्दाची ओळख पटली
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । मंगळवारी रेल्वे स्टेशन परिसरात एका अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळून आला होता. अखेर त्या वृध्दाची ओळख पटली असून शालिकराम गणपत सापते (६४, रा. मूर्तीजापूर,जि.अकोला) असे या वृध्दाचे नाव आहे. मयत शालीकराम हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रेल्वे स्टेशन परिसरात अनोळखी वृध्दाचा मृतदेह मंगळवारी रोजी लोहमार्ग पोलिसांना आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.
त्यानुसार बुधवारी मुलगी सीमाबाई (रा.खडकेचाळ) हिने जिल्हा रुग्णालयात वडिलांचा मृतदेह ओळखला. त्यानंतर मयत वृध्दाचे नाव शालीकराम सापते असल्याचे समोर आले. वृध्दाच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. मयत शालीकराम हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपास अनिल नगराळे करित आहेत.
हे देखील वाचा :