⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महविद्यालयात एमबीबीएस पहिल्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाच्या पहिल्या फेरीच्या प्रवेशप्रक्रियेस १ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. सोमवार, ७ फेब्रवारीपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. यात कोविड नियमांचे पालन करुन महाविद्यालयातील एका भव्य सभागृहात ही प्रवेश प्रकिया सुरु आहे. यात विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश प्रक्रिया पुर्ण करून घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी स्वत: त्यांच्याकडुनच कागदपत्रांची पुर्तता करून घेतली जात आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी वर्गवारीनुसार गुणवत्ता यादी यापुर्वीच जाहीर झालेली आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र टिम

एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र टिम डीन डॉ. एन.एस. आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आली असुन प्रवेश प्रक्रियेचे नोडल अधिकारी म्हणुन डॉ. दिलीप ढेकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डॉ. देेवेंद्र चौधरी, विजय मोरे, मिलींद सरोदे, अमोल बोंडे, पंकज राणे यांचा या टिममध्ये समावेश आहे. तसेच राजू राणे, रितेश बोरोले, गजानन जाधव, जितेंद्र महाजन, संजय भिरूड, शरद सोनवणे, गुणवंत कोल्हे, भूषण चौधरी, विकास पाटील, परेश बोरोले, राजेश पाटील हे परिश्रम घेत आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा उपलब्ध – डॉ. दिलीप ढेकळे

एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातून येणार्‍या सर्व पालक- विद्यार्थ्यांसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातच आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती प्रवेश प्रक्रियेचे नोडल अधिकारी डॉ. दिलीप ढेकळे यांनी दिली. कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांना कुठेही बाहेर जाण्याची गरज पडू नये याची दक्षता महाविद्यालयाकडुन घेतली जात आहे. दि. १३ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया पुर्ण करून दि. १४ फेबु्रवारीपासून एमबीबीएसचा महाविद्यालयीन अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचेही नोडल अधिकारी डॉ. ढेकळे यांनी सांगितले.

हे देखील वाचा :