⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

गावठी कट्टा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२२ । चोपडा तालुक्यातील लासूर ते नाटेश्वर रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून, कालीपिली चारचाकीतून गावठी कट्टा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या व दोन काडतुसे असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत, संशयिताला अटक केली. ही कारवाई पोलिस महानिरीक्षक व चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीवरून केली.


गुप्त माहितीवरून पथकातील सहाय्यक उपनिरीक्षक बशीर तडवी, हेड कॉन्स्टेबर रामचंद्र बोरसे, पोलिस नाईक मनोज दुसाने, राकेश पाटील, चोपडा ग्रामीणचे पोलिस नाईक रितेश चौधरी, राकेश पाटील यांनी सापळा रचला होता. लासूर ते नाटेश्वर रस्त्यावर कालिपिली गाडी थांबवून पोलिसांनी गाडीची झडती घेतली. वाहनात संशयित श्रावणसिंह छोटू राजपूत (वय २७, रा. भुरजगड, ता.जि. जैसलमेर, राजस्थान) हा जात होता. त्याच्याकडे गावठी कट्टा व दोन काडतुसे सापडली. चोपडा ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली. संशयिताकडून २५ हजार रुपयांचा गावठी कट्टा व दोन हजार रुपये किमतीची दोन काडतुसे, असा २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

हे देखील वाचा :