---Advertisement---
जळगाव जिल्हा

रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईटचा पदग्रहण सोहळा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२४ । रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईटचा पदग्रहण सोहळा २०२४-२०२५ नुकताच पार पडला. यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईट तर्फे आयोजित या सोहळयाला रोट्रॅक क्लब ऑफ गोदावरी एलिट चे अध्यक्ष ओम प्रकाश सिंग तसेच सचिव संजय तापडिया, गोदावरी कॉलेज इंजिनीरिंगचे प्राचार्य विजयकुमार पाटील, डॉ वर्षा पाटील वूमेन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अँप्लिकेशनच्या प्राचार्य डॉ. निलीमा वारके, रोट्रॅकटर मोहित शामनांनी, तसेच विध्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.

padgrahan

तसेच रोट्रॅक क्लब ऑफ गोदावरी एलिट चे नवीन अध्यक्ष रोट्रॅकटर भूमिका नले आणि सचिव निधी पाटील यांना वर्ष २०२४-२०२५ चा कार्यभार सोपविण्यात आला तसेच नवीन एकूण ४३ रोट्रॅक सदस्य नोंदविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटेरियन ओम प्रकाश सिंग यांनी विध्यार्थ्यांना रोट्रॅक क्लब मध्ये उत्साह आणि समाजाचे आपण देणे लागतो यासाठी सतत कार्यरत होण्यासाठी प्रोत्साहित केले शेवटी रोट्रॅक क्लब ऑफ गोदावरी एलिट चे समन्वयक प्रो प्राजक्ता पाटील आणि प्रज्ञा बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचालन केले तसेच रोट्रॅक क्लब ऑफ गोदावरी एलिटची सचिव निधी पाटील यांनी आभार मानले .

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---