मोबाईल चार्जरने गळा आवळून पत्नीचा खून, स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला पती!

ऑक्टोबर 2, 2022 1:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२२ । शहरात पंधरा दिवसांच्या खंडनंतर पुन्हा एकदा खून झाला आहे. पतीने पत्नीचा मोबाईल चार्जरच्या साहाय्याने गळा आवळून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, पती स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

murder 1 1

जळगाव शहरातील आहुजा नगर परिसरातील शिवधाम मंदिरासमोरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये पतीने पत्नीचा मोबाईल चॉर्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. कविता जितेंद्र पाटील वय २० असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर जितेंद्र संजय पाटील वय २५ असे संशयित पतीचे नाव आहे. जितेंद्र हा पत्नीला गळफास दिल्यानंतर स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पत्नीचे तरुणासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून पतीने हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आहुजा नगर परिसरात ब्रह्मांडनायक अपार्टमेंट असून अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये जितेंद्र संजय पाटील हा पत्नी कविता व दीड वर्षाची मुलगी असे कुटुंबासह वास्तव्यास आहे. जितेंद्र हा मिळेल ते काम करुन कुटुंबाचा गाडा हाकत होता. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पती जितेंद्र याचा पुन्हा पत्नीसोबत वाद झाला. वाद वाढत गेल्याने जितेंद्र याने मोबाईलच्या चार्जरच्या वायरने पत्नी कविता हिचा गळा आवळून खून केला. पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर पती जितेंद्र हा स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. व त्यानेच पोलिसांना मी पत्नीचा खून केल्याची माहिती दिली.

तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. तातडीने कविता हिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now