जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय येथे विनयभंगातून झालेला मनस्ताप सहन न झाल्याने १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना गुरुवारी समोर आली आहे. याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
बेलव्हाय येथील युवराज उर्फ गोलू रवींद्र नेहेते (वय २३) हा मंगळवारी (दि.१) लैंगिक गैरवर्तन करण्याच्या उद्देशाने पीडित मुलीच्या घरी गेला. तेथे मुलीला आमिष दाखवून तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर अल्पवयीन पीडित मुलीने मनस्ताप करून घेऊन राहत्या घरात छताच्या कडीला ओढणीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.
गुन्हा दाखल
दरम्यान, या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह भादवि कलम ३०५, ३०६, ३५४ (अ), (१), ४५२ यासह पोस्को ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार हे करत आहेत.
हे देखील वाचा :
- भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवून जिंकू शकते – चंद्रकांत पाटील
- Avinash Bhosale : डीएचएफएल घोटाळा प्रकरणी अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक,
- जळगावात दुचाकी चोरीचे सत्र कायम : दोन दुचाकी लंपास
- Sex Worker : स्वमर्जीने वेश्या व्यवसाय गुन्हा नाही पण .. सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निर्णय
- मोठी बातमी : जिल्हा परिदेच्या राणधुमाळीला सुरुवात गट, गण प्रभाग रचनांचे काम सुरु
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज