जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र.लो. येथील विमलबाई गोबा मांग या वृद्ध महिलेने भोगवटा असलेल्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. चार दिवसांपासून महिलेने अन्नपाणी न घेतल्याने महिलेची प्रकृती खालावली असून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इम्रान शेख यांनी वैद्यकीय तपासणी केली. महिलेस मोठ्या प्रमाणात अशक्तपणा असल्याचे सांगून तिच्या पोटात अन्न पाणी नसल्यामुळे अशक्तपणा आल्याचे सांगितले.
सविस्तर असे की, उपोषणकर्त्या महिलेच्या शरीरात ताकद नसल्याने तिला बसून राहणे अशक्य झाले आहे. विमलबाई यांनी, मला ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढणार असल्याचे लेखी हमीपत्र द्यावे, अशी मागणी केली आहे. तत्पूर्वी या अगोदर पंचायत समितीने ग्रामपंचायतीस दोन वेळा अतिक्रमण काढण्यासाठी लेखी पत्र व्यवहार केला. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी पवार व विस्तार अधिकारी दिलीप सुरवाडे यांनी स्वतः गावी जावून अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अतिक्रमण धारकांनी गोंधळ घालून अतिक्रमण काढण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे महिला चार दिवसांपासून आमरण उपोषणास बसली असून शुक्रवारी उपाेषणाच्या चाैथ्या दिवशी तिची प्रकृती बिघडली आहे.
- विज पडुन जिवीत हानी होऊ नये यासाठी ‘दामिनी’ ॲप डाउनलोड करा
- मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई : 15 लाखांचा गुटखा केला नष्ट
- अभिमानास्पद : खान्देश कन्या कवियीत्री बहिणाबाई चौधरी यांचे लवकरच येणार टपाल तिकीट
- तृतीयपंथीयांसाठी महत्वाची बातमी : सरकार राबवणार आहे हे विशेष शिबीर
- शेकऱ्यांनो लक्ष द्या : आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज