⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मान्सूनच्या आगमनापूर्वी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जून २०२३ । मान्सूनच्या आगमनापूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. ती म्हणजेच केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान हमीभाव किमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा एमएसपीमध्ये अधिक वाढ करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयात सरकारने धानाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये भाताच्या किमान हमीभावामध्ये (MSP) 143 रुपयांची वाढ केली आहे, तर ज्वारीच्या किमान हमीभावामध्ये 210 रुपायंची वाढ करण्यात आली आहे. भात पिकाच्या किमान हमीभावामध्ये वाढ होऊन आता ती 2183 रुपये करण्यात आली आहे, तर ज्वारीचा किमान हमीभाव आता 235 वर पोहोचला आहे.

कोणत्या पिकांना किती हमीभाव?
भात – 2183 रुपये – 143 रुपयांची वाढ
ज्वारी – 3180 रुपये – 143 रुपयांची वाढ
ज्वारी मालदांडी – 3225 रुपये – 235 रुपयांची वाढ
रागी – 3846 – 268 रुपयांची वाढ
तूर – 7000 रुपये – 400 रुपयांची वाढ
सोयाबीन – 4600 रुपये – 300 रुपयांची वाढ
मूग – 8558 रुपये – 803 रुपयांची वाढ
तिळ – 8635 रुपये – 805 रुपयांची वाढ