Dharangaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाबाबत ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्फत माळी समाज व समता विचार फाउंडेशन जळगाव यांनी राज्य शासनाचे आभार मानले.
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील थोर समाजसुधारक आणि महिला शिक्षणाच्या अग्रणी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी विशेषत: महिला शिक्षणासाठी खूप मोलाची भूमिका बजावली आहे. आज भारतामध्ये स्त्री शिक्षणाविषयी निर्माण झालेली जागृती ही फुले दाम्पत्याने केलेल्या कार्यामुळेच आहे. त्यामुळे फुले दाम्पत्याने केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये त्यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.
यावेळी उद्योगपती दिलीप बापू पाटील,समता विचार फाउंडेशन चे अध्यक्ष भूषण महाजन,माजी सभापती संजय पाटील,माजी सरपंच हेमंत पाटील,चंदू माळी, संजू महाराज,पप्पू माळी,आबा माळी,समाधान माळी व सुधीर माळी आदी उपस्थित होते.