मुले पकडणारी गॅंग आली, वाचा गल्लोगल्ली काय सांगताय पोलीस..

सप्टेंबर 24, 2022 6:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । शहरासह जिल्ह्यात सध्या मुले फिरणारी गॅंग आली असल्याचे मेसेज तुफान व्हायरल होत आहेत. लहान मुलांना घरात ठेवा असे आवाहन मेसेजद्वारे केले जात आहे. दरम्यान, जळगाव शहरात पोलीस स्वतः जीप घेऊन याबाबत आवाहन करीत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना नागरिकांना करीत आहे.

jalgaon 73

पोलिस काय सांगताय?.. वाचा तसेच तसं!
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आम्ही पोलीस अधीक्षक, जळगाव आव्हान करतो की, मागील ५/६ दिवसा पासुन जळगाव जिल्हयांत लहान मुले/ मुली यांना पळविणारी टोळी असुन ती लहान मुले / मुली एकटे दिसल्यावर त्यांना पळवून घेवून जातात. या संदर्भात मोबाईल Whataap वर पोस्ट टाकण्यात आल्याने सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. जळगाव जिल्हयांत लहान मुले/मुली पळविणारी अशी कोणतीही घटना घडलेली नाही किंवा अशी कोणतीही गंग (टोळी) सर्किय नाही. ही केवळ अफवा आहे.

आपल्या गावात, शहरात, कॉलनी मोबाईल Whataap वर, फेसबुक, इन्स्टांग्राफ व इतर सोशल मिडिया या माध्यमातुन लहान मुले/मुली पळविल्या संदर्भात जर कोणती पोस्ट व्हायरल होत असेल तर आपण त्याबाबत स्वतः खात्री करावी अथवा आपल्या नजिकच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्याबाबत माहिती द्यावी. विनाकारण जमाव जमवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करु नये. जेणे करुन जळगाव जिल्हयांतील शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहचणार नाही.

जो कोणी अशा प्रकारच्या पोस्ट मोबाईल Whataap वर, फेसबुक, इन्स्टांग्राफ व इतर सोशल मिडियावर व्हायरल केल्यामुळे जळगाव जिल्हयांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीत व्यक्तीवर सायबर ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच जे नागरिक गावात, शहरात, कॉलनीत किंवा पोलीस स्टेशनला अशा पोस्ट वरुन जमाव जमवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास त्यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल. जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आबादित राहण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याबाबत आव्हान करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now