डिपीवर शाॅर्टसर्कीटमुळे लागली आग, महिलांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे अकराच्या सुमारास शाॅर्ट सर्कीट झाल्याने आग लागुन शेजारी असलेल्या उकीरड्यांनी पेट घेतला. वेळीच महिलांनी सतर्क होऊन आग विझवली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाॅर्ड क्र एक मधील पाणी पुरवठा ट्युबवेल जवळील विद्युत ट्राॅन्सफाॅर्मर वर आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जोरात वारा सुरु झाल्याने तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन शाॅर्टसर्कीट झाला. स्पार्कींग होऊन आगीचे गोळे खाली पडले. सदर डिपीला उकीरड्यांचा वेढा असल्याने उकीरड्यांवरील केरकचऱ्याने पेट घेतला व आग लागली.आगीमुळे पुढील अनर्थ घडणार तोच आजुबाजुंच्या महिलांनी धाव घेऊन आग विझवली. हाती मिळेल त्या भांड्यांनी पाणी आणत आग विझवली.
महावितरण कार्यालयाकडुन वारंवार ग्राम पंचायतीला संबंधित उकीरड्यांबाबत तक्रारी देवूनदेखिल ग्रामपंचायत स्तरावरून याबाबत कारवाई झाली नसल्याची माहीतीही समोर येत आहे. सदर परीसरात पाणीपुरवठा करणारी ट्युबवेल असुन आजुबाजुला उकीरडे असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
तसेच कुऱ्हा येथील महिला शेतकरी बेबाबाई जनार्दन वरुळकर यांचे बोदवड शिवारातील शेती गट नं ११६ मधील पाच एकर ऊस जळुन खाक झाला.सुनिल बेलदार,महेंद्र पांडव,प्रतिक गोयनका,ईश्वर खिरडकर,महादेव बेलदार आदींनी आग विझवली.मात्र तोपर्यत ऊस जळुन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.परीपक्व झालेला ऊस मजुर मिळत नसल्याने तोडणी वेळेवर झाली नाही असे समजते.कारखान्याचे कुऱ्हा भागाचे गट प्रमुख निलेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
हे देखील वाचा:
- Bhusawal : 20 हजार रुपयाची लाच घेताना महावितरणचा उपकार्यकारी अभियंता जाळ्यात
- Pachora : पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांची आकडेवारी समोर
- Jalgaon : आगीच्या घटनेनं धावत्या गाडीतून उड्या मारल्या, पण दुसऱ्या एक्स्प्रेसने अनेकांना चिरडले..
- जळगावात आगीच्या भीतीने प्रवाशांनी एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; पण समोरून येणाऱ्या एक्प्रेसने अनेकांना चिरडले
- जळगावातील कालिंका माता चौकात पुन्हा अतिक्रमणाची परिस्थिती निर्माण