जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नसून अशातच एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पतीसह मुलांना जीवेठार मारण्याची धमकी देत ३० वर्षीय महिलेवर जबरी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, जळगाव शहरातील एका भागात ३० वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. याच परिसरात राहणाऱ्यास नुर मोहम्मद शेख लतिफ (वय ४०) याने २० जुलै रोजी रात्री महिलेच्या घरी येवून माझ्या विरोधात तक्रार करते असे बोलून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार कुणाला सांगितला तर पतीसह मुलांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत महिलेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री संशयित आरोपी नुर मोहम्मद शेख लतिफ याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा ददाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदर हे करीत आहे.