---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावातील कालिंका माता चौकात पुन्हा अतिक्रमणाची परिस्थिती निर्माण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील कालिंका माता चौकात 25 डिसेंबर रोजी डंपर खाली येऊन नऊ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी डंपर जाळला होता, ज्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर, जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कालिंका माता चौकात कारवाई केली होती. या कारवाईमध्ये रस्त्यावर गाड्या लावून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली होती. मात्र, काही दिवसांच्या अवधीनंतर, या चौकात पुन्हा अतिक्रमणाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर दुकाने थाटून व्यवसाय सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे वाहतुकीला अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

kalinka mata chaok

कालिंका माता मंदिर चौक हा जळगाव शहरात प्रवेश करताना एक महत्त्वाचा रस्ता आहे. या ठिकाणी झालेल्या त्रिफुल्लीमुळे वाहतुकीला अनेक अडचणी येतात. महामार्गावर पडलेल्या दुभाजकामुळे जुन्या जळगाव मध्ये जाणाऱ्या रस्त्यातही अडचणी येतात. सायंकाळी या ठिकाणी अतिक्रमणाची समस्या आणखीच वाढते, व खेडी कडे जाणाऱ्या रिंग रोडवर चौपाटीच लागलेली असतात.

---Advertisement---

या चौकात एका राजकीय पुढाऱ्याने वाढदिवसाचा बॅनर लावला आहे, ज्यामुळे महामार्गाच्या लागून असलेल्या रस्त्यांवर अशाप्रकारे बॅनर लावण्याची परवानगी दिलेली आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर हीच परिस्थिती दिसून येत आहे, मात्र ठोस कारवाई कुठेच होताना दिसून येत नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---