⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

डिसेंबरमध्ये बँका इतक्या दिवस राहणार बंद; वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । नोव्हेंबर महिना संपत आला आहे आणि डिसेंबर महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित काम करण्याचे तुम्ही काही नियोजन केलेले असेल तर आधी या महिन्यात येणाऱ्या सुटयांबाबत तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे. डिसेंबर महिन्यात तब्बल १६ दिवस बँकांना सुटी राहणार आहे. त्यामुळे आरबीआयने जारी केलेल्या सुट्ट्यांची यादी नक्की पहा.

पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये एकूण १६ दिवस बँकेला सुट्ट्या असणार आहेत. यामध्ये ४ रविवार आणि दुसरा व चौथ्या शनिवारचा समावेश आहे तर अनेक सुट्ट्या लागून येणार आहेत. या महिन्यात ख्रिसमसचा सण आहे. ज्याची सुट्टी देशातील जवळपास सर्व बँकांमध्ये साजरी केली जाते. मात्र, सर्वत्र १६ दिवस बँका बंद राहणार नाहीत. काही सुट्ट्या स्थानिक असल्याने काही ठिकाणी बँका बंद राहतील.

अशा आहेत सुट्या
३ डिसेंबर रोजी (सेंट फ्रान्सिस झेवियरचा उत्सव असल्याने पणजीत बँका बंद राहतील), ५ डिसेंबर (रविवार), ११ डिसेंबर (महिन्याचा दुसरा शनिवार), १२ डिसेंबर (रविवार), १८ डिसेंबर (यू सो सो थामची पुण्यतिथी, शिलाँगमध्ये बँका बंद), १९ डिसेंबर (रविवार), २४ डिसेंबर (ख्रिसमस सण, आयझॉलमध्ये बँका बंद), २५ डिसेंबर (महिन्याचा चौथा शनिवार, ख्रिसमस, बंगळुरू आणि भुवनेश्वर वगळता सर्व ठिकाणी बँका बंद), २६ डिसेंबर (रविवार), २७ डिसेंबर (ख्रिसमस सेलिब्रेशन, आयझॉलमध्ये बँका बंद), ३० डिसेंबर (यू कियांग नोंगबाह, शिलॉन्गमध्ये बँका बंद), ३१ डिसेंबर (नवीन वर्षांची संध्याकाळ, आयझॉलमध्ये बँका बंद)