---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

Pachora : पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांची आकडेवारी समोर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२५ । पाचोरा नजीकच्या परधाडे स्टेशनजवळ घडलेल्या रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. यात 9 पुरुष आणि तीन महिला आहेत. या घटनेतील गंभीर जखमींवर पाचोरा ग्रामीण रुग्णालय तसेच पाचोरा येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकाड वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

pushpak

नेमकं काय घडलं?
पाचोरा जवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी ५.४७ वाजता पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांमधून धुर आल्याने आगीची अफवा पसरुन पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी रुळांवर उतरले तेवढ्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडले. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला. दोन्ही ट्रेनला थांबविण्यात आल्या आहेत. त्यानंतर एटीआर ट्रेन घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. गंभीर जखमींवर पाचोरा ग्रामीण रुग्णालय तसेच पाचोरा येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

---Advertisement---

पाचोरानजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---