किन्ही येथील कुटुंबाला जि.प. सदस्य रविंद्र पाटील यांच्याकडून आर्थिक मदत

सप्टेंबर 29, 2021 6:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१। भुसावळ तालुक्यातील किन्ही येथे पावसामुळे घराचे नुकसान झाल्याने कुटुंबीय उघड्यावर आले होते. या कुटुंबाला जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी आर्थिक मदत करत मदतीचा हात दिला आहे.

Untitled design 2021 09 29T175124.306 jpg webp

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील बाळू चावदस कोळी यांच्या घराची भिंत कोसळली होती. त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले होते. या घरातील कर्ते पुरुष बाळू कोळी हे असाध्य रोगाने त्रस्त असून त्यांची पत्नी दिव्यांग आहे. या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने या कुटुंबाला आर्थिक हातभार मिळावा या हेतूने आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी दहा हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून कोळी कुटुंबाला दिली. तसेच प्रशासनाला पंचनामा करून संबंधित कुटुंबाला सरकारी मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, जोपर्यंत त्यांच्या घराची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत ज्या भाड्याच्या घरात हे कुटुंब राहणार आहे त्या घराचे भाडे सुद्धा श्री. पाटील हे देणार आहेत. दरम्यान, जि.प. सदस्य रविंद्र पाटील यांनी केलेल्या मदतीबद्दल कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले. यावेळी सचिन सोनवणे, माजी सरपंच प्रदीप कोळी, ग्रामपंचायत सदस्य सुरेश येवले, संजय येवले, जितेंद्र ठोके, किशोर पाटील, रविंद्र पाटील, शांताराम बाविस्कर, गोलु ठोके, शाम येवले आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now