जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । गेल्या महिन्यात पार पडलेल्या बोदवड पालिकेच्या निवडणुकीत १७ पैकी ९ जागांसह बहुमत मिळवले आहे. आता १८ फेब्रुवारीला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही धोका नको म्हणून शिवसेनेचे सर्व नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत. दुसरीकडे ७ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीने तूर्त ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका ठेवली आहे.
बोदवड पालिकेत १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता पालिकेत विशेष सभा होईल. पीठासीन अधिकारी प्रांत रामसिंग सुलाने असतील. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे सर्व ९ नगरसेवक सहलीवर रवाना केले. त्यांच्यासोबत भाजप नगरसेवकाच्या मुलाची उपस्थिती असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तूर्त सईद बागवान व आनंदा पाटील या दोघांची नावे चर्चेत आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी १४ फेब्रुवारीला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज भरता येईल. नंतर छाननी होऊन वैध व अवैध उमेदवारांची नावे प्रसिद्ध होतील. १७ फेब्रुवारीला माघार घेता येईल. यानंतर १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता विशेष सभा होईल, त्यानंतर बोदवडला कुणाचा नगराध्यक्ष होणार हे निश्चित होणार आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान
- मतदानाच्या शेवटच्या क्षणी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना दिला धक्का; काय आहे बातमी वाचा..
- जळगाव जिल्ह्यात १ वाजेपर्यंत २७.८८ टक्के मतदान
- उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला मोठा धक्का
- जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांचा उबाठा गटाला जय महाराष्ट्र!