तरुणीचा कुजलेला मृतदेह डोण शिवारात आढळला

फेब्रुवारी 17, 2022 10:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । तालुक्यातील डोण शिवारातील बेलगंगा नाल्यात १२ ते १८ वर्षे वयाच्या तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

death 58

डोण देवळी शिवारात गोविंदा निकम यांच्या शेताच्या बाजुस असलेल्या बेलगंगा नाल्यात ७ रोजी सायंकाळी अनोळखी तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या तरूणीची ओळख पटू शकली नाही. मृतदेहाची अवस्था पाहता तो काही दिवसापासून पाण्यात पडून असावा असा अंदाज आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार करीत आहे.

मृतदेहाच्या शरीरावर निळसर रंगाचा टॉप, ज्यावर पांढरा व लालसर रंगाची फुलांची डिजाईन, काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, दोन पोपटी रंगाच्या प्लास्टिकच्या बांगड्या आढळल्या आहेत. पोलिसांनी ओळख पटवण्याचे आव्हान केले आहे. तरुणीने आत्महत्या केली, की तिचा घातपात झाला, याचा उलगडा पोलिसांना करावा लागणार आहे. पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. घटनास्थळाच्या परिसरात बारकाईने निरीक्षण केले आहे.

हे देखील वाचा:

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now