जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२२ । सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यानंतर रेग्युलेटर पेटल्यानंतर दोघे जखमी झाले. ही घटना गुरुवार, 5 मे रोजी सायंकाळी सहा वाजता शहरातील पॉलिटेक्नीक कॉलेजमागील एका नास्ता सेंटरमध्ये घडली.
अधिक माहिती अशी की, रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या जवळ पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे प्रकाश भोळे यांचे सावकारे नाष्टा सेंटर नावाचे दुकान आहे. गुरूवार, 5 मे रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास दुकानातील गॅस सिलेंडरच्या रेगुलेटरमधून अचानक गॅस गळती झाल्याने आग लागली. अचानक आग लागल्याने गल्लीतील नागरीकांनी धाव घेवून मिळेल तसे पाण्याचा फवारा मारण्यास सुरूवात केली. या आग विझविण्याच्या प्रयत्नात ज्योती विजय सावकारे व विजय सावकारे हे दोघे किरकोळ जखमी झाले. आगीत दुकानातील एक लाखांचे नुकसान झाले. काही मिनिटातच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि जळगाव महानगर पालिकेच्या अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल होऊन काही मिनिटात आग आटोक्यात आणली व सिलेंडर बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाचे वाहन चालक देविदास सुरवाडे, भगवान जाधव, वसंत कोळी यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.