जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । यावल तालुक्यातील पाडळसे जवळील पाटचारीत बामणोद येथील ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. कैलास कडू सोनवणे (33, बामणोद, ता.यावल) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी घटस्फोट झालेला हा तरूण मंगळवारपासून बेपत्ता होता.
बामणोद येथील रहिवासी कैलास कडू सोनवणे (वय ३३) हा तरूण मंगळवारपासून बेपत्ता झाला होता. याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी फैजपूर पोलिसांत हरवल्याची तक्रार देखील केली होती. सर्वत्र शोध सुरू असताना सोमवारी सकाळी बामणोद-फैजपूर दरम्यानच्या पाटचारीत शेतमजुरांना एक मृतदेह दिसला. यानंतर फैजपूर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेहाची ओळख पटवली. त्यात मृतदेह कैलास सोनवणे यांचा असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, मंगळवारी बेपत्ता झालेल्या कैलासचा चार दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता. पत्नीपासून विभक्त झाल्याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. यावलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. मृताच्या पश्चात एक मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल
- जळगावात चाकूचा धाक दाखवून वाइन शॉप चालकाला मागितली खंडणी; गुन्हा दाखल
- बसच्या धडकेत सैन्य दलातील जवान गंभीर जखमी; जळगाव शहरातील घटना