जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याधापकाने विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे करीत असल्याची तक्रार येथील गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाढ यांच्याकडे दाखल होती. याची दखल घेत शुक्रवारी गट शिक्षण अधिकारी नईम शेख यांनी शाळेला भेट देऊन पालकांचे जाबजबाब घेतले. या प्रसंगी पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
शाळेत मुख्याधापक विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे करीत असल्याची तक्रार स्थानिक शिक्षण समितीचे अध्यक्षांनी येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाढ यांच्याकडे केली असून या मुख्याध्यापकाच्या निलंबनाची मागणी केली आहे. या तक्रारी वरून गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाढ यांनी गट शिक्षण अधिकारी नईम शेख यांना शाळेत जावून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी गट शिक्षण अधिकारी नईम शेख यांनी पालकांशी व विद्यार्थिनीशी संवाद साधला असता पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तसेच पालकांचे व विध्यार्थीनीचे जाबजबाब नोंदविले आहे. यावेळी पाडळसे केद्र शाळेचे केद्र शिक्षक सुनिल पाटील उपस्थित होते. गटशिक्षण अधिकारी नईम शेख यांनी तसा अहवाल गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्याकडे साधर केला आहे.








