⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

अल्पवयीन मुलावर अत्याचार, आरोपीला ७ वर्ष कैदेची शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना चोपडा येथे ६ मार्च २०१८ रोजी घडली होती. ‘त्या’ आरोपीस सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सचिन गुलाबराव सैंदाणे (वय ३२, रा. लासूर, ता.चोपडा) असे या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.

चोपडा येथील १३ वर्षीय मुलगा हा शाळेच्या दुपारच्या मधल्या सुटीत केक घेण्यासाठी दुकानाकडे जात होता. त्याचवेळी दिव्यांग असलेल्या सचिन सैंदाणे याने या मुलाला जबरदस्तीने शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात नेले व त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. मुलाने कशी बशी सुटका करीत तो जवळच असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. मुलाची हकिकत ऐकून हे. कॉ. महेश पाटील यांनी आरोपीला पकडून आणले. मुलाच्या नातेवाइकांनाही बोलावण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोक्सो कायद्यांतर्गत ठोठावली शिक्षा

या खटल्याचे कामकाज अमळ येथील जिल्हा न्यायालयात झाले. सरकारी वकील अॅड. किशोर बागुल यांनी यात दहा साक्षीदार तपासून युक्तिवाद केला.

न्यायालयाने पीडित, डॉ. गुरुप्रसाद वाघ, मुख्याध्यापक राजेंद्र साठे यांची साक्ष तसेच न्याय वैज्ञानिक विभागाचा अहवाल ग्राह्य धरला. आरोपी सचिन यास सात वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा तसेच पोक्सो कायदा कलम ४ प्रमाणे सात वर्षे व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

पैरवी अधिकारी म्हणून हिरालाल पाटील व केस वॉच म्हणून नितीन कापडणे यांनी काम पाहिले.

हे देखील वाचा :