दुचाकी अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । अमळनेर येथील कुऱ्हे गावाजवळ दोन दुचाकींची बुधवारी समोरासमोर धडक झाली. त्यात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एका जखमीवर उपचार सुरू आहेत.

shock 6 jpg webp

तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथील शिवाजी मोतीराम पाटील हे त्यांचा नातू सतीश सोबत कामानिमित्त अमळनेर येथे दुचाकीने (क्र.एम.एच.१९-डी.एम.४४९१)आले होते.काम आटोपून ते घरी जात असताना कुऱ्हे गावाजवळ सती माता मंदिरापुढे, दुपारी साडेतीन वाजता, समोरून येणाऱ्या दुचाकीने (क्र.एम.एच.१८-बी.व्ही.६९५३) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. समोरून येणाऱ्या दुचाकीचा चालक योगेश संतोष पाटील (रा.नकाने मोरणे, ता. जि. धुळे) याने जोरदार धडक दिली. त्यात शिवाजी पाटील यांना कमरेला, उजव्या पायाला मार लागून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु धुळे येथे नेण्याचा सल्ला दिला. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now