बसच्या धडकेत सैन्य दलातील जवान गंभीर जखमी; जळगाव शहरातील घटना

जानेवारी 13, 2025 12:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात दररोज कुठेना कुठे अपघात होतच असल्याचं दिसत आहे. यात काहींना जीवही गमवावा लागला आहे. अशातच शहरात प्रवेश केल्यानंतर स्वातंत्र्य चौकातील अरुंद वळणावर एसटी महामंडळाच्या भरधाव बसने दुचाकीस्वार ३५ वर्षीय सैन्य दलातील जवानाला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी केलं. अभिमन्यू लक्ष्मण शिनकर (३५, रा. आमखेडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर, ह. मु. अरिहंत कॉलनी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुणे येथे हलवण्यात आले.

accident jpg webp

अभिमन्यू शिनकर हे सुटी घेऊन घरी आले आहे. रविवारी दुचाकीने (क्र. यूके ०७, डीएफ ५४५१) त्यांच्या मोठ्या भावाकडे जात असताना स्वातंत्र्य चौकात त्यांना मागून भरधाव बसने घडक दिली. यात शिनकर हे रस्त्यावर कोसळले व बसचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने गंभीर जखमी झाले. तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी तुषार जोशी व गणेश पाटील यांनी शिनकर यांना जीएमसीत दाखल केले. नातेवाईक रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी अभिमन्यू शिनकर यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पायाची अनेक हाड मोडलेली असल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now