⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | ठाकरे गटाच्या शिवसेनेत खांदेपालटाचे संकेत ; जळगाव जिल्हा प्रमुखपदासाठी यांच्या नावाची चर्चा

ठाकरे गटाच्या शिवसेनेत खांदेपालटाचे संकेत ; जळगाव जिल्हा प्रमुखपदासाठी यांच्या नावाची चर्चा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२४ । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत संघटनात्मक बदलाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. विद्यमान जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांना पदावरून हटवून अन्य जबाबदारी सोपवली जाऊ शकते. त्यांच्या जागेवर जिल्हा प्रमुखपदासाठी शरद तायडे व कुलभूषण पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

दरम्यान ठाकरे गटाचे नेतृत्व स्वीकारलेले माजी खासदार उन्मेष पाटील यांची उपनेतेपदी पदोन्नतीचे संकेत मिळत आहेत, लोकसभा निवडणुकीत १३ वर्षांनंतर प्रथमच निवडणूक लढलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मतदानापर्यंत जळगाव लोकसभा मतदारसंघात पक्षाचे जोरदार वातावरण तयार केले होते. निवडणूक चुरशीची होईल असाच अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या नाराजीचा फायदा पक्षाकडून घेत शेतकऱ्यांच्या अडचणींना प्रचारात ढाल बनवली होती. त्याचा मतदानासाठी काहीअंशी फायदा झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. अडीच लाखांच्या फरकाने उबाठा शिवसेनेचे उमेदवार करण पवारांचा पराभव झाला.

उन्मेष पाटलांना बढती मिळण्याची शक्यता
लोकसभेच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात दाखल झालेले माजी खासदार उन्मेष पाटील यांनीच पक्षाचे नेतृाच हाती घेतले होते. आता पक्षांतर्गत संघटनात्मक बदलात उन्मेष पाटलांवर उपनेता पदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.