⁠ 
शनिवार, मे 18, 2024

Temperature Jalgaon : जळगावात उन्हाचा पारा स्थिर ; वाचा आजचे कसे असेल तापमान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । जळगावात उन्हाचा पारा ४० अंशावर स्थिर आहे. गेल्या महिन्यात उष्णतेने जळगावकर चांगलेच हैराण झाले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून पूर्वमोसमी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळतोय दरम्यान, आज तापमानाचा पारा ४१ अंशांवर राहण्याची शक्यता आहे.

यंदा मान्सून केरळात वेळेआधीच दाखल झाला आहे. आता मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असून, आज शुक्रवारी तो राज्याच्या दक्षिण कोकणात अर्थात तळ कोकणात, तसेच गोव्यात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यापूर्वी मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे.

गेल्या मे महिन्याच्या सुरुवातीलाच जळगावात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक होरपळून निघाले होते. त्यावेळी उन्हाचा पारा ४५ ते ४६ अंशावर गेला होता.सकाळी १० वाजेपासूनच तापमानाचा पारा ४० अंशावर जात होता. त्यामुळे असह्य उकाडा जाणवत होता.

मात्र गेल्या काही दिवसापासून पूर्वमोसमी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. मात्र सध्या पूर्वमोसमी पावसासाठी क्युमुलस ढगांची उत्तर महाराष्ट्रात गर्दी झाली आहे. मंगळवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.तर सध्या तापमानाचा पारा एका अंशाने वाढला आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
११ वाजेला – ३६ अंश
१२ वाजेला – ३७ अंश
१ वाजेला- ३८ अंशापुढे
२ वाजेला – ४० अंश
३ वाजेला – ४१ अंशापुढे
४ वाजेला – ४१ अंश
५ वाजेला – ४१ अंश
६ वाजेला – ४१ अंश
७ वाजेला – ३९ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३७ तर रात्री ९ वाजेला ३६ अंशावर स्थिरावणार.