जळगावात उन-सावल्यांचा खेळ ; तापमान ४० अंशांखाली, वाचा आजचा कसे असेल तापमान?

मे 31, 2022 11:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । राज्यात सध्या पूर्वमोसमी पावसाचे ढग दाटून येत असून जळगावात उन-सावल्यांचा खेळ सुरु आहे. सोबतच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जळगावातील पारा ४० अंशांखाली आहे. सोमवारी जळगावात तापमानाचा पारा ३९.४ अंश इतका नोंदविला गेला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळतोय. दरम्यान, आज तापमानाचा पारा ४० अंशांवर जाण्याची शक्यता आहे.

tapman

दरम्यान, यंदा मान्सून केरळात वेळेआधीच दाखल झाला आहे. यानंतर राज्यातील अनेक भागात पूर्वमाेसमी पाऊस कोसळत आहे. तर काही दिवसापासून पूर्वमोसमी वाऱ्यामुळे जळगावातील पारा घसरला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच जळगावात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक होरपळून निघाले होते. त्यावेळी उन्हाचा पारा ४५ ते ४६ अंशावर गेला होता. तर जिल्ह्यातील भुसावळ येथे राज्यातील सर्वाधिक ४७ अंशावर अधिक तापमानाची नोंद झाली होती.

सकाळी १० वाजेपासूनच तापमानाचा पारा ४० अंशावर जात होता. त्यामुळे असह्य उकाडा जाणवत होता. मात्र गेल्या काही दिवसापासून पूर्वमोसमी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळत आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
११ वाजेला – ३६ अंश
१२ वाजेला – ३७ अंश
१ वाजेला- ३९ अंशापुढे
२ वाजेला – ४० अंश
३ वाजेला – ४१ अंशापुढे
४ वाजेला – ४० अंश
५ वाजेला – ३९ अंश
६ वाजेला – ३८ अंश
७ वाजेला – ३७ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३६ तर रात्री ९ वाजेला ३४ अंशावर स्थिरावणार.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now