⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

Temperature Jalgaon : मान्सून गोव्यात अडकला, जळगावकरांना बसणार उकाड्याचा फटका

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२२ । यंदा मान्सून केरळात वेळेआधीच दाखल झाला असला तरी तो गोव्याजवळ असून पुढील वाटचालीस हवामान पोषक नसल्याने त्याची प्रगती थांबली आहे. त्यामुळे राज्यात मान्सूनसाठी प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे राज्यात तापमानाचा पारा वाढलेला दिसून येतोय. राज्यातील बहुतांश ठिकाणी उकाडा वाढला असून प्रत्येकजण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. शनिवारी जळगावात तापमानाचा पारा ४१.४ अंशावर होता.

मागील काही दिवसात राज्यातील बहुतांश ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उन्हाचा पारा कमी झाला होता. मात्र गेल्या काही दिवसात उकाडा पुन्हा वाढला आहे. काल जळगावसह राज्यात १७ शहरांत पारा ४० अंशावर होता. गेल्या महिन्यात उष्णतेने जळगावकर चांगलेच हैराण झाले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून पूर्वमोसमी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली.

जळगावात मागील काही दिवसापासून उन्हाचा पारा ४० अंशावर स्थिर होता. परंतु गेल्या दोन तीन दिवसापासून तापमानाचा पारा ४१ अंशावर जात आहे. त्यामुळे उकाड्यात पुन्हा जाणवत आहे. दरम्यान, एकीकडे मान्सूनचा प्रवास मंदावला असला तरी तिकडे उत्तर आणि मध्य भारतात मात्र उष्णतेची लाट आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
११ वाजेला – ३६ अंश
१२ वाजेला – ३८ अंश
१ वाजेला- ३९ अंशापुढे
२ वाजेला – ४१अंश
३ वाजेला – ४२ अंशापुढे
४ वाजेला – ४२ अंश
५ वाजेला – ४२ अंश
६ वाजेला – ४२ अंश
७ वाजेला – ४० अंश
आणि रात्री ८ वाजेला ३८ तर रात्री ९ वाजेला ३७ अंशावर स्थिरावणार.