जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२५ । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज, शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वनडे आणि टी-२० संघाची घोषणा केली. या घोषणेमध्ये सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे वनडे फॉर्मेटच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माला काढून टाकण्यात आलंय. तर ही धुरा शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. वि

टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान वनडे आणि टी 20I सीरिज खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर टी 20I मालिकेत 5 सामन्यांचा थरार रंगणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
बीसीसीआयने रोहित शर्मा याचा एकदिवसीय कर्णधारपदावरुन पत्ता कट केला आहे. तर शुबमन गिल याला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच विराट कोहली याचंही एकदिवसीय संघात कमबॅक झालं आहे.
निवड समितीने टीम भारताच्या कर्णधारासह उपकर्णधारही बदलला आहे. शुबमनला उपकर्णधारपदावरुन कर्णधार करण्यात आलं. त्यामुळे आता शुबमननंतर श्रेयस अय्यर टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. श्रेयस एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार होता. रोहितनंतर श्रेयसला कॅप्टन करण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र ही फक्त चर्चात ठरलीय.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, रविवार, 19 ऑक्टोबर, पर्थ
दुसरा सामना, मंगळवार, 23 ऑक्टोबर, एडलेड
तिसरा आणि अंतिम सामना, शनिवार, 25 ऑक्टोबर, सिडनी.











