धरणगावात गुरु-शिष्याच्या नावाला काळीमा! नऊ वर्षांच्या चिमुरडीवर शिक्षकाचा अत्याचार

मे 16, 2026 6:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुक्यातून शिक्षण क्षेत्राला आणि गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जिल्हा परिषद शाळेतील नराधम शिक्षकाने चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित शिक्षक नंदलाल नारायण मराठे (वय ५०, रा. द्वारकानगर, जळगाव) याला अटक केली आहे. धरणगाव तालुक्यातील सव्वा महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.

image 46 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित शिक्षक नंदलाल मराठे हा गेल्या दोन वर्षांपासून (जून २०२४ ते एप्रिल २०२६ दरम्यान) पीडित बालिकेचा छळ करत होता. शाळेच्या वेळेत तो पीडित मुलीला वर्गात एकटे बोलवायचा आणि मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार करायचा. हे कृत्य कोणाला सांगितल्यास ‘तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन’, अशी धमकी तो चिमुरडीला देत असल्याने पीडित मुलगी कमालीच्या दहशतीखाली होती.

एप्रिल महिन्यात शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर पीडित बालिका तिच्या नातेवाइकांकडे गेली होती. तिथे काहीशा सुरक्षित वातावरणात आल्यावर तिने तिच्यासोबत घडलेला हा धक्कादायक आणि अमानुष प्रकार नातेवाइकांना सांगितला. मुलीचा हा आपबिती ऐकून नातेवाइकांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी तात्काळ मुलीच्या आईशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.

या घटनेची माहिती मिळताच बालिकेच्या आईने धरणगाव पोलीस ठाणे गाठून नराधम शिक्षकाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी शिक्षक नंदलाल मराठे याला तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून अशा विकृत शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now