आलं आहे Tata च “टाटा पे” अ‍ॅप ; मिळतील भरघोस रिवार्डस

एप्रिल 10, 2022 5:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । मिठापासून ते स्टीलपर्यंत उत्पादन करणाऱ्या टाटा या कंपनीने आपले सुपर ॲप लाँच केले आहे. टाटाचे सुपर ॲप Tata Neu आता लाईव्ह झाले आहे. हे ॲप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या ॲपद्वारे कंपनी Amazon, Flipkart, Paytm आणि इतर सुपर ॲप्सशी स्पर्धा करणार आहे. Tata Neu वर अनेक सेवा युरर्सला मिळणार आहेत. UPI पेमेंटपासून ते हॉटेल किंवा फ्लाईट बुकिंग, किराणा सामान खरेदीपर्यंत इतर अनेक पर्याय तुम्हाला येथे मिळतील.

tata pay jpg webp

खरेदीवर, हे ॲप रिवॉर्ड म्हणून Neu Coins देत आहे. एका Neu नाण्याचे मूल्य 1 रुपये इतके आहे. तुम्ही Google Play Store आणि Apple App Store वरून Tata Neu ॲप डाउनलोड करू शकता. टाटाने गेल्या आठवड्यात या ॲपची घोषणा केली.

पेमेंट सेवा

टाटा पेच्या मदतीने तुम्ही ब्रॉडबँड, वीज, गॅस, लँडलाइन, मोबाईल रिचार्ज आणि डीटीएच रिचार्ज करू शकता. UPI ​​पेमेंटचा पर्यायही मिळेल. म्हणजेच UPI चे फीचर देखील Tata Pay सोबत जोडण्यात आले आहे. याच्या मदतीने कार्ड, नेट बँकिंग आणि UPI सेवांद्वारे पेमेंट उपलब्ध होणार आहे.

गुंतवणूक

तुम्ही Tata Neu ॲपवरही गुंतवणूक करू शकता. यामध्ये, झटपट वैयक्तिक कर्जापासून ते डिजिटल सोने, विमा आणि इतर अनेक विशेष योजना उपलब्ध आहेत. होम अवे सिक्योर प्लॅन, कार्ड फ्रॉड सिक्योर प्लॅन यांसारख्या योजनाही यावर उपलब्ध आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now