⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक घ्या!

संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक घ्या!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक लवकर घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. देवकांत बाजीराव पाटील यांनी यावल नायब तहसीलदार आर.डी.पाटील याच्याकडे निवेदनाद्वारे केली. दरम्यान, नायब तहसीलदार यांनी लवकरच बैठक घेऊन निराधार लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले.

यावल तालुका संजय गांधी निराधार योजना समिती, श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांची मार्च 2022 पासूनबैठक न झाल्यामुळे नवीन लाभार्थ्यांची मंजुरी न मिळाल्यामुळे नवीन लाभार्थ्यांना अनुदान मिळत नसून ते अनुदानापासून वंचित राहत आहेत. तरी या निराधार असणाऱ्या लोकांना विधवा, ज्येष्ठ नागरिक ,अपंग यांचा समावेश असतो तरी या लोकांना आपल्या उपजीविके कामे करण्याकरता अनुदानाची आतुरतेने वाट पाहत असतात व त्यांना त्या व्यतिरिक्त जास्तीचे उत्पन्नाची साधने नसतात. तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर या संदर्भात मीटिंग घेऊन प्रकरण मंजूर करून जे नवीन व योग्य लाभार्थी असेल त्यांना लवकरात लवकर लाभ मिळवून द्यावा असे आशयाचे निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष ॲड देवकांत पाटील, शहराध्यक्ष हितेश गजरे, राष्ट्रवादीचे समन्वयक किशोर माळी, सरचिटणीस हेमंत दांडेकर, संघटक शब्बीर खान आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह