जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगावात !

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२३ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांच्या कन्येच्या विवाह सोहळा आज पार पडत आहे. या सोहळ्याला ते हजेरी लावणार आहेत. (eknath shinde in jalgaon)

eknath shinde jpg webp

मुख्यमंत्री शिंदे यांचं दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी शासकीय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. यासंदर्भातला दौरा जिल्हा प्रशासनाला मंगळवारी सायंकाळी उशिरा प्राप्त झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांची कन्या अमृता सोनावणे हिचा विवाह सोहळा जळगावातील एम. जे. कॉलेजच्या एकलव्य क्रीडा मैदानावर होत आहे. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी राहणार आहेत

. मुख्यमंत्र्यांसोबतच अनेक मंत्री व आमदार या विवाह सोहळ्याला हजर राहण्याची शक्यता आहे. विवाह सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्री जळगाव विमानतळावरून शासकीय विमानाने लातूरकडे रवाना होणार आहेत.

Related Articles

Back to top button