गुन्हेपाचोरा

भयंकर! चारित्र्याच्या संशयातून गाढ झोपेतच पत्नीला संपविले, पाचोऱ्यातील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या लोहारा येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात पतीने मध्यरात्रीच्या गाढ झोपेत असलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. अर्चना उर्फ कविता नितीन शिंदे असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव असून हत्या करून नितीन शिंदे हा पोलीस स्टेशनमध्ये हजर झालाय. चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

lohara news

पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन नितीन शिंदे हा आपल्या पत्नीला मारहाण करत होता. तसेच घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी देखील तगादा लावला होता. पैसे न आणल्याने चारित्र्यावर संशय घेत पत्नीला मारहाण करत होता. यातूनच झोपेत असलेल्या पत्नीवर हल्ला करत नितीन शिंदे याने पत्नीची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनास्थळी पोलिसांसह फॉरेनसिक पथकाकडून तपासणी करण्यात आली. मृत विवाहिता कविताचा भाऊच्या फिर्यादीवरून पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीची हत्या करून नितीन शिंदे हा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असून या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. दरम्यान पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नितीन शिंदे हा आपल्या पत्नीला मारहाण करत होता तसेच घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावत होता, अशी फिर्याद मयत विवाहितेचा भाऊ आकाश सपकाळ याने दिली आहे. पती नितीन शिंदे व सासू बेबाबाई शिंदे यांनी मिळून बहीण कवितावर हल्ला करत तिची हत्या केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांकडून आता सखोल तपास केला जात आहे.

यात या खूनी घटनेने चिमुकले मुलगा, मुलगी यांचे मातृछत्र हरपले व वडिलांना जेलमध्ये जावे लागणार असल्याने अकरा व बारा वर्षांचे भाऊ-बहिण पोरकी झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button