शुक्रवार, डिसेंबर 8, 2023

आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन 14 वर्षीय मुलीवर अत्याचार, जामनेरातील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । जळगाव जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसून येतेय. अशातच जामनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. 14 वर्षीय मुलीवर एका महिलेच्या घरात नेवून वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. याबाबत संशयित महिला ज्योती ज्ञानेश्वर चौधरी व सोनू बाळू पडोळ (रा.जामनेर तालुका) यांच्याविरोधात गुन्हा जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जामनेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी अल्पवयीन तरुणी वास्तव्यास आहे. संशयित सोनू पडोळ याने मुलीच्या अल्पवयीन पणाचा फायदा घेत बदनामी करण्याच्या धमकीने तसेच तिच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत ज्योती चौधरी हिच्या घरी नेत तिच्यावर अत्याचार केला.

जानेवारी 2023 मध्ये दोन वेळा व एप्रिल 2023 मध्ये एक वेळा अत्याचार करण्यात आल्याचे पीडीतेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोस्कोन्वये गुन्हा दाखल केला असून संशयित सोनू बाळू पडोळ यास अटक केली आहे. तपास पोलीस उपअधीक्षक धनंजय येरूळे करीत आहेत.