बातम्याजळगाव शहर

अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । शहरातील शिरसोली नाका परिसरात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत २ जुलै रोजी रात्री उशीरा प्रर्यन्त रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ramandnagar jpg webp

शहरातील डीमार्ट समोरील शिरसोली नाका परिसरात १७ वर्षीय मुलगी ही आई, वडील आणि भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलगी ही मु.जे. महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. २ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास कॉलेजला जावून येते असे सांगून घरातून गेली. सायंकाळपर्यंत अल्पवयीन मुलगी घरी न परतल्याने तिच्या आईवडीलांनी तिचा शोधाशोध करण्यास सुरूवात केली. त्यांचे नातेवाईक आणि मैत्रीणींकडे तपास करूनही कोणतीही माहिती मिळाली नाही. रात्री उशीरा अल्पवयीन मुलीच्या आईने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Related Articles

Back to top button