जळगाव जिल्हाराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इंनकमिंग, माजी आमदाराने केला प्रवेश!

जळगाव लाईव्ह न्यूज | ५ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची आज जळगावात स्वाभिमान सभा होत आहे. जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर ही सभा होत आहे. यावेळी अमळनेरच्या माजी आमदाराने शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

bs patil jpg webp

अमळनेरचे माजी आमदार बी.एस.पाटील आणि चोपडा येथील युवा नेतृत्व डॉ.चंद्रकांत बारेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते मफलर घालून त्यांचा प्रवेश करवून घेण्यात आला.

दरम्यान, बी एस पाटील हे खान्देशातील मोठं नाव आहे. ते तीनवेळा आमदार राहिले आहेत. त्यांना 2009 च्या निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते स्वगृही भाजपात परतले होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button