जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । आयुष्यमान भारत व आरोग्यवर्धिनी दिनाला १४ एप्रिल ला चार वर्ष पूर्ण होत असल्याने १६ रोजी तामसवाडी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आरोग्यवर्धिनी दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये ई- संजीवनीच्या माध्यमातून आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या ठिकाणी ई- संजीवनी पोर्टल मार्फत टेली कन्सल्टेशन सेवा उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच मनीषा पवार व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. समाधान वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, डॉ. पवन राजपूत, कन्सल्टंट नितीन राठोड, सुविधा व्यवस्थापक जगताप, समूह व्यवस्थापक उपस्थित होते. कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील जाधव, डॉ. चेतन पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संगीता पाटील व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज