गुन्हेभुसावळ

शिक्षण घेत नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मोबाईल लांबवला

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । मुक्ताईनगरात नोकरीस असलेला व जळगाव अभियांत्रिकीचा विद्यार्थी गिरीश सूर्यकांत मुनेश्वर (वय १८, रा.समतानगर भुसावळ) याचा १६ हजार ५०० रूपये किमतीचा मोबाइल भुसावळ बस स्थानकातून लंपास झाला. ही घटना सोमवारी (दि.१४) घडली.

mobile chor

गिरीश हा भुसावळ बसस्थानकावर आल्यानंतर ही घटना झाली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस नाईक तुषार के.पाटील करत आहेत. प्रवास करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हे देखील वाचा:

Related Articles

Back to top button