जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । महिलांसह अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही वाढतच असून नराधमांना कायद्याचा कुठलाही धाक नसल्याचे दिसून येतेय. अशातच अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला ५ ते ६ जणांनी उचलून नेत तिच्यावर सामूहिकरित्या अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आज शनिवारी पहाटे समोर आला आहे.
नेमका काय आहे प्रकार?
पाचोरा तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी १३ मे रेाजी रात्री ९ वाजता गल्लीतील मैत्रीणीसोबत बोलत होती. त्यानंतर मात्र अल्पवयीन मुलगी गायब झाली. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला. गावातील २० ते २५ जणांनी दुचाकी काढून गावातील आजूबाजूच्या शेतात शोधमोहिम राबविली. गावातील वातावरण शांत झाल्यानंतर अज्ञात ५ ते ६ जणांनी १४ वर्षीय मुलीला उचलून नेत तिच्यावर सामूहिकरित्या अत्याचार केला आणि पिडीत मुलीला पहाटे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर गावातील महिलांच्या शौचालयाजवळ सोडून दिले.
अल्पवयीन मुलगी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीला आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पिडीत मुलीला पाचोरा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत अद्याप पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. शेवटचे वृत्त हाती आले पिडीत मुलीचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान संशयित आरोपी हे गावातीलच असल्याची दाट शक्यता असून त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे.