जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांनी हॉस्पिटलमध्ये जावून घेतली खडसेंची भेट; वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज : ६ नोव्हेंबर २०२३ : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना छातीत अस्वस्थ वाटल्याने त्यांना जळगाव येथे एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात होते. पुढीच उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे. रात्री त्यांना जळगाव विमानतळावरुन एअर ॲम्बूलन्सने मुंबईला नेत्यात आले. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी रुग्णालयात जावून खडसेंची भेट घेत प्रकृतीची चौकशी केली. यावेळी मंदाकीनी खडसे व एकनाथ खडसे यांचे खासगी डॅाक्टर डॉ. अभिषेक ठाकुर यांनी शरद पवारांना तब्येतीविषयी माहिती दिली.

khadse jpg webp

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना रविवारी हृदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांना जळगाव येथील एका खासगी हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते. तेथे काही तपासण्या व प्राथमिक उपचार केल्या नंतर त्यांना मुंबई येथे हलविण्याच्या निर्णय घेण्यात आला. खडसे यांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती गजानन हार्ट केअर सेंटरचे डॉ. विवेक चौधरी यांनी दिली आहे.

दरम्यान शरद पवार यांनी रुग्णालात जावून खडसेंची भेट घेत प्रकृतीची चौकशी केली. यावेळी मंदाकीनी खडसे व एकनाथ खडसे यांचे खासगी डॅाक्टर डॉ. अभिषेक ठाकुर यांनी शरद पवारांना तब्येतीविषयी माहिती दिली. एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असून कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, अशी माहिती खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी दिली आहे.

डॉ. युवराज परदेशी

पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.

Related Articles

Back to top button