T20 World Cup : सेमी फायनल निमित्त पाकिस्तानमध्ये आज सुट्टी, पंतप्रधान कार्यालयाची घोषणा

टी ट्वेण्टी सेमीफायनलची पहिली थरारक मॅच आज क्रिकेट विश्वाला पाहायला मिळणार आहे. आजच्या मॅचवर पावसाचं सावटं आहे. सिडनी मैदानावर आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज न्यूझिलंड आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. न्यूझिलंड (NZ) टीमने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. यामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये सुट्टी जाहीर केली आहे.

आज पाकिस्तानमध्ये सुट्टी आहे. त्यामुळे चाहत्यांना आज संपुर्ण मॅच पाहता येणार आहे. आजच्या सुट्टीमुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आज पाकिस्तानमध्ये डॉक्टर अल्लामा मोहम्मद इक्बाल यांचा 145 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने संपुर्ण देशात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

https://twitter.com/_FaridKhan/status/1589921647418834946?s=20&t=xzlpLCafRPoy039lrOYGjA

न्यूझीलंड टीम

केन विल्यमसन, मार्टिन गप्टिल, फिन ऍलन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, ऍडम मिल्ने, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, टिम साउथी, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम , ट्रेंट बोल्ट

बाबर आझम, आसिफ अली, हैदर अली, खुशदिल शाह, शान मसूद, मोहम्मद हारिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, मोहम्मद रिझवान, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी