जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । नागरिकांचे मोबाइल हिसकावून पळून जाणाऱ्या संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेंदालाल मिलमधील एका रिक्षामधून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या मोबाइलसह गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
मोहंमद अनिस उर्फ मोहंमद युनूस पिंजारी (वय २८, रा. गेंदालाल मिल), मनोज विजय अहिरे (वय ३०, रा. गेंदालाल मिल) व रहेमान रमजान पटेल (वय ३७, रा. लक्ष्मीनगर गेंदालाल मिल) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. एरंडोल ठाण्यात दाखल गुन्हा मोहंमद पिंजारी याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. तिघांना पुढील तपासासाठी त्यांना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.