⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सूर्याेदय साहित्य संमेलनाचे ७ मे रोजी आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे शहरात ७ व ८ मे रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॉ. प्रभा गणोरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. त्यात चार कविसंमेलने रंगणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली.

सदर संमेलन हे जिल्हापेठेतील कांताई सभागृहात होणार असून, संमेलन कालावधीसाठी डाॅ. भवरलाल जैन सभागृह, प्रा. पुरुषोत्तम पाटील व्यासपीठ, त्र्यंबक सपकाळे साहित्य नगरी, काव्यरत्नावलीकार नानासाहेब फडणीस प्रवेशद्वार अशी नावे देण्यात आली आहे. ७ मे रोजी पहिले कविसंमेलन लेखिका पौर्णिमा हुंडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली हाेईल. दुसऱ्या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी भगवान भटकर हे असतील. सूत्रसंचालन अँड. विलास मोरे करतील. ८ मे रोजी तिसरे कविसंमेलन होईल. कवी कमलाकर देसले अध्यक्षस्थानी असतील. सूत्रसंचालन अनिल शिंदे करणार आहे.

चौथे कविसंमेलन अंजली कुलकर्णी पुणे यांच्या अध्यक्षतेत हाेईल. जयश्री काळवीट सूत्रसंचालन करतील. शोभा तेलंग (इंदूर), उषा हिंगोणेकर (जळगाव), प्रा. डॉ. साधना निकम (चाळीसगाव), प्रा. विमल वाणी (म्हसावद), लतिका चौधरी (दोंडाईचा), प्रा. रजनी लुंगसे (शिरपूर), सुरेखा बोऱ्हाडे नाशिक, मृणाल गिते (नाशिक), माधुरी चौधरी (औरंगाबाद), संध्या महाजन (जळगाव), जयश्री पाटील (वसमतनगर), प्रा. डॉ. दीपा ठाणेकर, सुनीता काटम, गिता गद्रे, चित्रा पगारे (जळगाव), शीतल पाटील, संध्या ललितकुमार भोळे, खैरुन्निसा शेख (जळगाव), ललिता टोके (भुसावळ) आदी कवयित्री सहभागी हाेणार आहे.