शासनाच्या निधीवर डल्ला; माजी सरपंचाला तीन दिवसांची पोलिस कोठडी

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२३ । बोदवड तालुक्यातील सुरवाडे बु ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल पारधी यांनी ग्रामपंचायतीच्या मिळणाऱ्या विविध प्रकारच्या निधीचा दुरुपयोग करून अपहार केल्याप्रकरणी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालय यांनी २७ फेब्रुवारी पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

सुरवाडे बु चे माजी सरपंच अनिल पारधी यांनी ग्रामपंचायतीच्या मिळणाऱ्या विविध प्रकारच्या निधीचा दुरुपयोग करून अपहार केला. विकास कामे न करता कागदोपत्री कामे करून शासनाच्या निधीवर डल्ला मारला आहे.

चौदावा वित्त आयोगाच्या, पंधराव्या वित्त आयोगाच्या, निधी सह भ्रष्टाचार केला. ते आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडी त आहेत. त्यांना बोदवड न्यायालयात हजर केले असता त्यांना बोदवड न्यायालय यांनी २७फेब्रुवारी पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. महेश घायताड उप पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी यांनी अनिल पारधी याला कोर्टात तपसाकामी पोलीस कोठडी मिळावी यासाठी कोर्टात हजर आणले होते.