⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

भारताच्या ‘या’ धडाकेबाज फलंदाजाने घेतली सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina ) आता यापुढे इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार नाही. त्याने संपुर्ण क्रिकेटला पूर्णपणे अलविदा केला आहे. आता तो फक्त परदेशी लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

सरेश रैनाने केले भावनिक ट्विट
सुरेश रैनाने ट्विटरवर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने भावनिक ट्विटमध्ये लिहिले की, ‘देश आणि उत्तर प्रदेश राज्यासाठी क्रिकेट खेळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. तसेच मी बीसीसीआय, यूपी क्रिकेट असोसिएशन, आयपीएल टीम सीएसके आणि राजीव शुक्ला यांचे आभार मानतो. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी चाहत्यांचेही आभार मानतो.

क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली
सुरेश रैनाने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघ आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसला. पण 2020 मध्ये कथा पूर्णपणे बदलली, जेव्हा चेन्नई सुपर किंग्सने त्याला कायम ठेवले नाही आणि कोणत्याही संघाने त्याला आयपीएल मेगा लिलाव 2022 मध्ये विकत घेतले नाही. परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी सुरेश रैनाने हे पाऊल उचलले आहे.

भारतीय संघाकडून कसोटीत रैनाला फार संधी मिळाली नाही. पण वनडेमध्ये त्याने धमाकेदार कामगिरी केली. कसोटीत १९ सामन्यात २६.१८च्या सरासरीने ७६८ धावा केल्या. २२६ वनडेत ३५.३१च्या सरासरीने ५ हजार ६१५ धावा केल्या. यात ५ शतक आणि ३६ अर्धशतकाचा समावेश आहे. प्रथम श्रेणीच्या १०९ सामन्यात त्याने ४२.१५च्या सरासरीने ६ हजार ८७१ धावा केल्या आहेत. यात १४ शतक आणि ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये रैनाने २०५ सामन्यता ५ जार ५२८ धावा केल्या असून यात १ शतक आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे.