Friday, December 9, 2022

अँन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरज नारखेडे

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२२ । अँन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरज नारखेडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. असे निवडीचे नियुक्ती पत्र अँन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र अरोरा यांच्या हस्ते देण्यात आले.

- Advertisement -

यापूर्वीही त्यांची माहिती अधिकार कायदा महासंघाच्या जळगाव सह तालुका प्रचारप्रमुख पदी निवड झाली आहे. निवडीबद्दल सुरज नारखेडे यांचे सर्वस्तरावरून अभिनंदन होत आहे.


दरम्यान, फाऊंडेशनची जिल्हास्तरीय आढावा बैठक ५ ते ६ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथें आयोजित केली आहे. या बैठकीत फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष सुरज नारखेडे यांना आमंत्रित केले आहे. यावेळी ते जळगाव जिल्ह्यात विविध प्रशासनातील काम करतांना येणार्‍या अडचणीबाबत बैठकीत चर्चा करून अहवाल देणार आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा :


- Advertisement -
[adinserter block="2"]