जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे राष्टवादीच्या दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे. अजित पवार यांनी बंड करुन शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे आता अजित पवार आपला गट निर्माण करणार असून त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असणार आहेत. असे वृत्त समोर येत आहे.
तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ९ आमदारांवर अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे.
आज सकाळी अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये सुनिल तटकरे हे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती येत आहे. अजित पवार हे अधिकृत पत्र काढून त्याबाबत घोषणा करतील, असं सांगण्यात येतंय.